आत्मविश्वास आई-वडील, गुरूंशिवाय मिळत नाही

पुणे : ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास हे आई-वडील आणि गुरूंशिवाय मिळत नाही, असे प्रतिपादन पुणे महापालिकेतील काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त समाजकारण-राजकारणात सदैव मार्गदर्शन करणारे पुणे महापालिकेतील काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल यांच्याविषयी आदराच्या भावना व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आयोजिलेल्या विशेष सोहळ्यात आबा बागुल बोलत होते. याप्रसंगी संयोजक अमित बागुल, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, अरुण कामठे, अश्विनी ताटे, हेमंत बागुल, कपिल बागुल उपस्थित होते. यावेळी आबा बागुल म्हणाले की, युवा पिढीचा संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास होण्याच्या दृष्टीने गुरु-शिष्याचे नाते सदैव महत्त्वपूर्ण आहे.
केवळ विद्या देऊन गुरुचे कार्य संपत नाही, तर आपल्या जीवनविषयक अनुभवातून आलेले शहाणपण शिष्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य गुरू करीत असतो. एक प्रकारे गुरू हा दिशादर्शक आहेे. यावेळी आबांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांकडून पाद्यपूजन करून अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली व विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली. कार्यकर्त्यांचे असे प्रेम पाहून आबा बागुल भावुक झाले होते. त्यांना पाहून कार्यकर्त्यांच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले