मुंबई : (Congress MLA not reachable) सोमवार दि.२० रोजी विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस पहायला मिळत होती. या निवडणूकीत भाजपला एकुण १३३ मतं मिळाल्यानं काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीची एकूण २१ मतं फुटली असल्यानं मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, याच पार्श्वभुमीवर काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे मुंबईत दाखल होण्यापूर्वीच काँग्रेसची चिंता वाढली आहे. शिवसेना पाठोपाठ काँग्रेसचेही ५ आमदार नाॅट रिचेबल आहेत. काँग्रेसकडून महाराष्ट्रातल्या ताज्या राजकीय स्थितीवर निरीक्षक म्हणून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अशोक गेहलोतही राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. काँग्रेस आमदारांचा दिल्ली दौरा रद्द करण्यात आल्या असून सर्वांना सायंकाळी ७ पर्यंत मुंबईत पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादीकडून शरद पवार मैदानात उतरले आहेत.