ताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन

Balu Dhanorkar Passed Away – चंद्रपूरचे काँग्रेसचे (Congress) खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं निधन झालं आहे. दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने धानोरकर यांना नागपूर इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने त्यांचं पार्थिव चंद्रपुरात आणण्यात येईल. तर उद्या वरोरा इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी ही माहिती दिली. (Balu Dhanorkar Passed Away)

बाळू धानोरकर हे लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार म्हणून अनेक वर्षे शिवसेनेत होते. त्यांनी अनेक वर्ष शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. ते 2014 ते 2019 दरम्यान वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार होते. तसंच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकरांनी काँग्रेसच्या तिकीटावर लढत माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करुन ते खासदार झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये