“भाजपाप्रणीत सरकारकडून ओबीसीवर अन्याय”; नाना पटोलेंचे गंभीर आरोप

नाशिक – Congress Manthan Nashik: “महाराष्ट्रात ईडीचे भाजपप्रणीत सरकार असल्यापासून ओबीसी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे.” असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केला आहे. नाशिक मध्ये कॉंग्रेसच्या मंथन सभेत ते बोलत होते.

भाजप सरकारने ओबीसी समाजाच्या मुलामुलींचे स्कॉलरशिप थांबवण्याचं अन्यायकारक काम केलं आहे. बांटीया अयोयाने ओबीसीच्या लोकसंख्येचा रिपोर्ट आणला, त्यानुसार राज्यात ३८ टक्के समाज ओबीसी आहे. मात्र, आडनावाच्या जीवावर आणलेल्या या रिपोर्टचा आम्ही विरोध करतो. महाराष्ट्रात जवळजवळ ६० टक्के ओबीसी समाजाची लोकसंख्या आहे. त्यानुसार सरकारने धोरणे आखावीत अशी आमची मागणी आहे.” असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.

“अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने गणपती समोर मदत पोहोचवत असल्याचं सांगितलं मात्र अजून कुठल्याही जिल्हाधीकार्यापर्यंत मदत पोहोचलेली नाही. या लोकांना देवाची देखील भीती वाटत नाही.” असा आरोपही पटोले यांनी केल आहे.

यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “केंद्र सरकारकडून ओबीसी समाजावर अन्याय केला जात आहे. केंद्र सरकारनेच लोकसभेत आमच्याकडे असणारा इम्पेरीकाल डेटा फक्त दोन टक्के चुकीचा आहे असं सांगितलं आहे. पण महाराष्ट्रातून राज्य सरकारने डेटा मागितल्यावर त्यांनी दिला नाही. कोर्टाकडून राज्याने स्वतः तो डेटा गोळा करावा म्हणून सांगितले. आणि बांटीया आयोगाने आडनावाच्या आधारे डेटा जमा केला. आडनावाच्या आधारे कोणीही ओबीसी समाजाची लोकसंख्या ठरवली जाऊ शकत नाही. त्यामुळे आमचं या आयोगाच्या रिपोर्टला पूर्ण विरोध आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.”

Dnyaneshwar: