मोठी बातमी! डॉ. सुधीर तांबेंना कॉंग्रेस हायकमांडचा दणका

नाशिक : Nashik Graduate Election Update : नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन राजकारण तापले आहे. काँग्रेस पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांच्यावर निलंबनाची (Sudhir Tambe Suspended By Congress) कारवाई करण्यात आली. पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई केली असल्याचे पत्र जारी करण्यात आले आहे. (Congress Suspends Dr Sudhir Tambe Over Nashik padvidhar matadar sangh elections)

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सुधीर तांबे यांची अधिकृत घोषणा झाल्यानंतरही त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हाय कमांडला दिली होती. तसेच कारवाईचीही मागणी केली होती. यावरुन हायकमांडने सुधीर तांबेंना निलंबित करण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्यांचावर कारवाईसाठी कमिटी बसवण्यात आली आहे.

दरम्यान, कॉंग्रेस हायकमांडच्या कारवाईनंतर डॉक्टर सुधीर तांबे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

Dnyaneshwar: