ताज्या बातम्या

‘सावरकर समझा क्या…’ काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपला डिवचले

नवी दिल्ली | काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपच्या दुखत्या नसेवर हात घातला आहे. रविवारी काँग्रेसने एक ट्विट केले त्यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘सावरकर समझा क्या… नाम- राहुल गांधी है…, असं ट्विट करून भाजपला डिवचले आहे. त्यामुळे भाजप नेते संतापले आहेत. त्यांनीही काँग्रेसला जशास तसे उत्तर देणे सुरू केले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये केलेल्या विधानावरून त्यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांना त्यांबाबतची डिटेल्स देण्याची किंवा खुलासा करण्याचे या नोटिशीत बजावले होते. पण राहुल गांधी यांनी नोटिशीला उत्तर न दिल्याने काल दिल्ली पोलीस त्यांच्या घरी गेली होती. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर राहुल गांधी त्यांच्या घरातून बाहेर पडले होते. त्त्यायानंतर आता पुन्हा एकदा त्याच कारणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे.

सावरकरांचे भक्त नाही

अदानींची चौकशी करण्याऐवजी राहुल गांधी यांची चौकशी केली जात आहे. अदानी मुद्द्यावरून वाचण्यासाठी आणि लक्ष विचलीत करण्यासाठी ढोंग केलं जात आहे. मालकाला वाचवण्यासाठी संपूर्ण सरकार मैदानात उतरलं आहे. आम्ही अदानीच्या मुद्द्यावर पंतप्रधानांना प्रश्न विचारले. त्यामुळे संतप्त झालेल्या हुकूमशहाने आमच्यावरच पोलीस पाठवले. त्यांना वाटतं आम्ही घाबरून जाऊ. माफी मागू. आम्ही तुमची हुकूमशाही सहन करू. पण लक्षात ठेवा आम्ही सावरकरांचे भक्त नाही. बापूंचे अनुयायी आहोत. आम्ही घाबरणार नाही, पराभूत होणार नाही. लढू आणि जिंकूही, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये