पुणे विमानतळावर आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

पुणे | Pune Updates – पुणे (Pune) विमानतळावर बाहेरून आलेला एक जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) निघाला आहे. हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सिंगापूरवरून आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे विमानतळार करण्यात आलेल्या चाचणीत हा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचं निदर्शनास आलं. या प्रवाशाचे नमुने घेण्यात आले असून जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठवण्यात येणार असल्याचे समजते. तसंच आता शहरात कोरोनाचा रूग्ण आढळल्यानं चिंता वाढली आहे.

पुणे महापालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी सांगितलं की, चिंता करण्याची गरज नाही. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून आपण विदेशातून येणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशासंबंधी माहिती देताना त्यांनी सांगितले की, ती 32 वर्षीय महिला आहे. त्यांना कोणतेही लक्षण जाणवत नाहीत. सध्या त्यांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

एकूण 20 ठिकाणी आपण लसीकरण सुरु केलं आहे. 90 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. पण बूस्टर डोस न घेणाऱ्यांची संख्या जादा आहे. त्यांना आम्ही या लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस (Booster Dose) घेण्यासाठी आवाहन करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

Sumitra nalawade: