अर्थताज्या बातम्याशेत -शिवार

कापसाची विक्री थांबवली! शेतकऱ्यांच्या निर्णयामुळे राज्यातील 80 टक्के जिनिंग बंद

नागपूर : (Cotton Market News) सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Production Farmers) संकटात सापडला आहे. कारण सातत्याने कापासाच्या दरात (Cotton Price) घसरण होत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरात घसरण असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांनी (Farmers) कापूस घरातच साठवूण ठेवला आहे. त्यामुळे राज्यातील कापसावर प्रक्रिया करणारे जवळपास 80 टक्के जिनिंग बंद पडले आहेत.

तर सुरु असलेले 20 टक्के जिनिंगही आता कापसाच्या अभावी बंद पडण्याच्या वाटेवर आहेत. यंदा राज्यात कापूस उत्पादन चांगलं झालं आहे. राज्यात सुमारे 500 च्यावर जिनिंग आणि त्यात काम करणारे सुमारे 3 लाख मजूर आहेत. ज्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे.

चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया यासारख्या देशांसह पश्चिम विदर्भातील कापूस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. मागणी असूनही यंदा कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग कापसाअभावी बंदच आहेत. त्यामुळे राज्यातील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुणावत आहे. मात्र, शेतकऱ्यांना उत्पादनावर आधारित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह जिनिंग चालकही संकटात सापडले आहेत.

मागील वर्षी कापसाच्या गुणवत्तेनुसार 10 हजारापासून ते 13 हजार रुपयापर्यंत भाव मिळाला होता. यंदा मात्र, हा कापूस दर अद्यापही आठ ते साडेआठ हजार रुपयांवर स्थिरावला आहे. अधिक भाव वाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळ असलेला कापूस विक्रीसाठी न आणता तो घरातच राखून ठेवणं पसंत केलं आहे. त्यामुळे कापसाच्या दरात कधी वाढ होणार याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये