पुणे होतोय हॉटस्पॉट; झोपी गेलेला जागा झाला!

राज्यात रुग्णांच्या वेगात गेल्या आठवड्यापासून सातत्याने पुण्यात १० हजारांहून अधिक रुग्ण
कोरोना मागील काही दिवसांपासून राज्यात रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिवसाला आढळणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या हजारांच्या पुढे पोहोचली आहे. तर आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यांतील उच्चांकी आकडा गाठला आहे. मंगळवारी राज्यात तब्बल 1 हजार 881 रुग्ण आढळून आले आहेत, हे दोन महिन्यांत आढळलेले सर्वाधिक रुग्ण आहेत. तर आज राजधानी मुंबईत 1242 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात २,९६२ रुग्णांची भर
राज्यात दिवसभरात ३ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी पुणे शहर ४२७, पिंपरी चिंचवड १९८; तर पुणे ग्रामीणमधील १९५ रुग्ण आहेत. मुंबईमध्ये बीए. ४ व्हेरिएंटचा १ नवा रुग्ण आढळला आहे. ती ६० वर्षांची महिला असून, ती घरगुती विलगीकरणात बरी झाली. आतापर्यंत राज्यात ६४ नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.
दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ
शहरात सध्या ९ हजार ७१४, पिंपरी चिंचवडमध्ये ३ हजार ६२६ आणि ग्रामीणमध्ये ७ हजार २०५ असे एकूण मिळून २० हजार ५४६ रुग्ण सक्रिय आहेत. त्याखालोखाल मुंबई महापालिका असून, तेथे १९ हजार ६१७ रुग्ण सक्रिय आहेत. तीन क्रमांकावर नागपूर, चौथ्या नाशिक व पाचव्या क्रमांकावर नगर जिल्हा आहे.
राज्यात सध्या दररोज अडीच ते साडेतीन हजार कोरोनारुग्ण वाढत आहेत. त्यापैकी सर्वाधिक वाढ मुंबई किंवा पुण्यात होत आहे. संभाव्य चौथी लाट आली तर त्यात रुग्णसंख्येबाबत पुणे टॉपवर राहण्याची शक्यता आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात एकाच आठवड्यात सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत ६६.११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
५ लाख जणांनी गमावला जीव
कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल ५,२५,२२३ लोकांना जीव गमवावा लागला आहे. ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे भारतातील कोरोना आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात एक लाखांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली.
२४ जणांचा मृत्यू
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १६,१३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २४ जणांचा मृत्यू झाला आहे.
दहापेक्षा कमी रुग्ण
दरम्यान, राज्यातील बीड, नंदूरबार आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांत प्रत्येकी दहापैकी कमी सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी नंदूरबार जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ चार सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. गोंदिया जिल्ह्यात नऊ आणि बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या जिल्हानिहाय आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
ताप, सर्दी, खोकला असल्यास त्वरित डॉक्टरांशी भेट घेऊन सल्ला घेऊन उपचार करून घ्यावेत.
_जोशी-नानोटी, MD होमिओपॅथी मेडिसीन्स
मृत्यू दर ५४ टक्के
या आठवड्यात मृत्यूची संख्या मागील सात दिवसांपेक्षा ५४ टक्के जास्त आहे. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये संसर्ग कमी झाला आहे. याउलट पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, आसाम आणि इतर काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढली.
४४ टक्के मृत्यू केरळमध्ये
७ दिवसांचा हा आकडा गेल्या चार महिन्यांतील उच्चांक आहे. २७ जून ते ३ जुलै दरम्यान कोरोनाची १.११ लाखांहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. या कालावधीत किमान १९२ मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी ४४ टक्के मृत्यू केरळमध्ये झाले.
शास्त्रज्ञांचं म्हणणं काय?
कोरोना विषाणूची निर्मिती निसर्गातच झाल्याचे ठोस पुरावे संशोधनातून मिळाले आहेत. कोरोना विषाणूची निर्मिती एका प्रयोगशाळेत करण्यात आली. चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. वुहानमधूनच कोरोनाचा विषाणू जगभरात पसरला. कोरोनाचा जन्म झाला कसा, असा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे. यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. कोरोनाच्या उगमावरून संपूर्ण जग चीनकडे पाहत आहे.
जागतिक पशुजन्य रोग दिवस
पशुजन्य रोगांच्या जोखमीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ६ जुलै रोजी जागतिक पशुजन्य रोग दिवस पाळला जातो. झुनोसेस हे संसर्गजन्य रोग (विषाणू, जीवाणू आणि परजीवी) आहेत जे प्राण्यांपासून मानवापर्यंत पसरतात किंवा मानवाकडून प्राण्यांकडे संक्रमित होतात. याच दिवशी ६ जुलै १८८५ रोजी प्रथमच लुई पाश्चरने रेबीज विषाणू विरुद्ध लस यशस्वीरीत्या दिली जो एक पशुजन्य रोग आहे. या दिवसाची आठवण म्हणून ६ जुलै हा दिवस जागतिक पशुजन्य रोग दिवस म्हणून पाळला जातो.
वटवाघळापासून कोरोनाची उत्पत्ती?
कोरोनाव्हायरसच्या उत्पत्तीबाबत अनेक शोध समोर आलेत. जेव्हा चीनमध्ये कोविड-१९ (COVID-१९) ची प्रकरणं झपाट्यानं वाढू लागली, वटवाघूळ या व्हायरसचा स्रोत असल्याचं म्हटलं गेलं. अद्यापही वटवाघूळ की साप, कुणाकडून कोरोनाव्हायरस आला, याबाबत संशोधकांना ठोस काही सापडलं नाही.
वुहान कोरोना व्हायरसचं केंद्र
चीन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या सुरुवातीच्या रुग्णांमध्ये न्यूमोनियासारखी लक्षणं दिसून आली. यापैकी बहुतेक प्रकरणं हुबेई प्रांतातल्या वुहान शहरातील सी-फूड मार्केटशी संबंधित होती. त्यामुळे चीनचे वुहान शहर कोरोना व्हायरसचं जागतिक केंद्र ठरले आहे.