क्राईमपिंपरी चिंचवड

कोयत्‍याच्‍या धाकाने भंगार दुकानदारास लुटले

कोयत्‍याचा धाक दाखवत भंगाराच्‍या दुकानातील रोकड चोरून नेली. ही घटना शिवराजनगर, रहाटणी येथे रविवारी (दि. २१ ) सकाळी दहा वाजताच्‍या सुमारास घडली.

रेहमुत्तल्ला इस्तीकार अहमद शेख (वय ३५, रा. आझाद कॉलनी, श्रीनगर, काळेवाडी) यांनी मंगळवारी (दि. २३) वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रमोद दयानंद कांबळे (वय २३), अभिषेक अमीरदास यादव (वय २६), सुरज शिंदे (चौघेही रा. रहाटणी), पवन शहादेव जाधव (वय २३, रा. जगताप नगर, थेरगाव) आणि अनिकेत पाटील (रा. छत्रपती चौक, काळेवाडी) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे शिवराजनगर, रहाटणी येथील आपल्‍या अली स्क्रैप सेंटर येथे असताना रविवारी सकाळी दहा वाजताच्‍या सुमारास आले. त्‍यांनी कोयत्यांचा धाक दाखवून शेख यांना हाताने मारहाण केली. तसेच दुकानाच्‍या ड्रॉवरमधील एक हजार 400 रुपये जबरदस्तीने चोरून नेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये