क्राईमताज्या बातम्यापुणे

शेअर मार्केटचे आमिष दाखवून तीन कोटींची फसवणूक; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे | शेअर मार्केट ट्रेडिंगमधून (Stock market trading) चांगल्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून शहरातील लेखापालाची तीन कोटी तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. चोरट्यांच्या आमिषाला बळी पडलेल्या सनदी लेखापालाने गुंतवणुकीसाठी एका बँकेकडून दोन कोटी रुपयांचे कर्ज काढले होते.

याबाबत एका ४९ वर्षीय सनदी लेखापालाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार सनदी लेखापाल एका खासगी कंपनीत कामाला आहेत. फेब्रुवारी महिन्यात सनदी लेखापालाला सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते.

शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असे सांगून चोरट्यांनी त्यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले होते. चोरट्यांच्या आमिषाला बळी पडलेल्या सनदी लेखापालाने दोन बँकांकडून दोन कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. गुंतवणूक केल्यानंतर सनदी लेखापालाला ॲपवर मिळालेल्या परताव्याची माहिती दिसत होती. त्यानंतर त्यांनी शेअर बाजारातून पैसे काढण्याबाबत चोरट्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून विचारणा केली. तेव्हा चांगला परतावा मिळाला असून, काही रक्कम सामाजिक कार्यासाठी द्यावी लागेल, असे चोरट्यांनी सांगितले. परतावा न दिल्याने सनदी लेखापालाला संशय आला. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये