नवरा काळा होता म्हणून बायकोने केलं धक्कादायक कृत्य; पेट्रोल घेतलं अन्…
Crime News | उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना घडली आहे. नवरा काळा होता म्हणून त्याच्या बायकोनं धक्कादायक कृत्य केलं आहे. नवरा काळा असल्यामुळे पत्नीनं त्याची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशमधील संभलच्या जिल्हा न्यायालयाने आरोपी पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी महिला ही रंगाने गोरी होती आणि तिचा नवरा काळा होता. त्यामुळे ती नवऱ्याचा सतत तिरस्कार करत होती. तर यावरून तिनं 15 एप्रिल 2019 रोजी रात्री पती झोपेत असताना त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. या घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी त्याला रूग्णालयात दाखल केले. पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर मृत पतीच्या भावानं पोलिसांमध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली.
मृत पतीच्या भावानं सांगितलं की, या घटनेदरम्यान तो त्याच्या वडिलांसोबत शेतात गेला होता. त्यावेळी त्याचा भाऊ घरी झोपला होता. त्यामुळे त्यानं भावाला चहा घेऊन येण्यासाठी फोन केला पण खूप वेळ झाला तरी भावाने फोन उचलला नाही आणि तो शेताकडे आला नाही. त्यामुळे भावाला पाहण्यासाठी तो घरी आला तर त्याला घडलेला सर्व प्रकार समजला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयानं आरोपी महिलेला दोषी ठरवून तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.