श्रावणानिमित्त भीमाशंकर मंदिरात भक्तांची मांदियाळी
पुणे | Shravan 2023 – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर शिवमंदिर हे अतिशय दुर्गम अशा डोंगरामधे वसले आहे. पहिल्या सोमवारी भीमाशंकर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात विधीवत पूजा करुन भीमाशंकरचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिराला तसेच शिवलिंगाला आकर्षक अशा फुलांनी सजविण्यात आले आहे.
पहिल्याच श्रावण महिन्यातील सोमवारी दोन लाख भक्त-भाविकांनी पवित्र शिवलींगाची पहाटेची ४.३० ला माहापुजा व आरती झाल्यानंतर दर्शन घेतले. ‘हर हर महादेव’च्या जय घोषनेने परिसर दुमदुमला होता. नागपंचमीनिमित्त मंदिर व गाभारा फुलांची सजावट, तर नागाची व महादेवांची फुलांनी आकर्षक सजाट करण्यात आली आहे.
दरम्यान, या परिसराचा विकास व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भीमाशंकर मंदिरास भेट द्यावी, अशी मागणी भीमाशंकर मंदिराचे विश्वस्त मधुकर गावंदेंनी व्यक्त केली आहे.