सिरम इंडियाचे सायरस पुनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, ॲंजिओप्लास्टी पूर्ण
पुणे : (Cyrus Punawala heart attack) उद्योगपती आणि सीरम इंडियाचे अध्यक्ष (Serum Institute of India) सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात डॉ. पुर्वेझ ग्रॅंट यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर ॲंजिओप्लास्टी (Angioplasty) झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, सायरस पुनावाला यांची प्रकृत्ती सध्या स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सायरस पुनावाला यांना शुक्रवारी सकाळी रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याची माहिती देण्यात आली.
रूबी हॉल क्लिनिककडून या संबंधित एक प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटलंय की, डॉ. सायरस पूनावाला यांना 16 नोव्हेंबर 2023 रोजी हृदयविकाराचा सौम्य इन्फार्क्ट झाला होता, त्यांना रुबी हॉल येथे दाखल करण्यात आले होते.
17 पहाटे, डॉ. सायरस पूनावाला यांनी डॉ. पुर्वेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी केली. ते लवकर बरे होत आहेत आणि रविवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळेल. डॉ. पूनावाला यांची तब्येत सध्या चांगली आहे.