कांदा दरवाढीवर दादा भुसे स्पष्टच बोलले; म्हणाले, “दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही तर…”
मुंबई | Dada Bhuse – सध्या संपूर्ण देशभरात टोमॅटोचे दर हे गगनाला भिडले आहेत. अशातच आता कांद्याच्या दरामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. केंद्र सरकारनं 31 डिसेंबरपर्यंत कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयानंतर कांदा उत्पादकांना आणि सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. याबाबत आता शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. कांदा हा जास्त दिवस टीकत नाही. तो प्रक्रिया करून टिकवण्यासाठी जो खर्च येतो तो भागत नाही. कांदा 20-25 रूपयांवर गेला आणि तो जर कोणाला परवडत नसेल तर त्याने दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडत नाही, असं दादा भुसेंनी म्हटलं आहे.