अर्थइतरपुणेस्टार्ट अपस्मार्ट उद्योजक

व्यावसायिकांना प्रोत्साहन देणारे सैफी बुरहानी बिझनेस एक्सपो 

राष्ट्र संचार न्यूज नेटवर्क
पुणे : दाऊदी बोहरा समाजातर्फे ४ ते ६ जानेवारी दरम्यान येरवडा स्थित डेक्कन काॅलेज ग्राऊंडवर भव्य चौथे सैफी बुरहानी बिझनेस एक्स्पो २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या उद्योग-व्यवसायांमधील लोकांना एकदुसऱ्यांशी कनेक्ट करून व्यावसायिकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुर्तजा जसदानवाला यांनी दिली.
महोत्सवासाठी अनेक गणमान्य व्यक्तींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये पुण्याचे खासदार तथा केंद्रीय नागरी उड्डान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका, महेंद्र पितालिया, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह उद्योग-व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रातील हजारो मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या एक्स्पोमध्ये नागरिकांनी लाखोंच्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन मुर्तजा जसदानवाला यांनी केले आहे.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, तीन दिवस आयोजित या एक्स्पोमध्ये एमएसएमईज, मॅन्यूफॅक्चरर्स, स्टार्टअप्स, आयटी कंपन्या, वुमेन एन्टरप्रेन्योर, रिटेलर्स, रिअल इस्टेट डेव्हलपर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर, एज्युकेशनल इन्स्टीट्यूट्स, हेल्थकेअर आणि वेलनेस प्रोफेशनल्स सह विविध क्षेत्रातील दाऊदी बोहरा समाजाचे उद्योजक आणि व्यावसायिकांचे जवळपास १७० स्टाॅल्स येथे असणार आहेत. एक्स्पो मध्ये देश-विदेशातून येणाऱ्या दाऊदी बोहरा समाजाच्या लोकांसह हजारो नागरिक यामध्ये सामिल होतील, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये