Top 5क्राईमताज्या बातम्यादेश - विदेशपुणे

धक्कादायक! सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न; तपास सुरू

दौंड : (conversion) दौंड शहरात (Daund Pune) एका वाल्मिकी समाजाच्या युवकाने मुस्लिम मुलींशी विवाह केला.त्याचे धर्मांतर बळजबरीने करण्याचा प्रयत्न झाल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे. या युवकाने सन २०१८ मध्ये मुस्लिम मुलीशी विवाह केला होता. तेव्हापासून हे दोघेही जण एका वीट भट्टीवर कामाला जात होते. ही गोष्ट, कुमेल कुरेशी उर्फ हाजी साब (Kumel qureshi, haaji sab) व आसिफ शेख (Asif Saikh) (दोघेही राहणार कुंभार गल्ली) यांना समजल्यावर त्यांनी बबलू मिलिंद चव्हाण (वय २८ वर्ष राहणार परदेशी बिल्डिंग कुंभार गल्ली दौंड) याला जबरदस्तीने निर्वस्त्र केले. त्याला प्रचंड मारहाण करण्यात आली. (Daund forcefully conversion crime)

एका इसमाने त्याच्या हातातील धारदार शस्त्रासारख्या वस्तूने त्याचा सुंता केला. लिंगाचे पुढील कातडे कापले त्यावेळी त्याला प्रचंड वेदना झाल्या. त्यांनी खूप विनंती केली व माफी मागितली व मी हे गाव सोडून जातो असे देखील सांगितले परंतु त्याचे काही एक ऐकले नाही.

यावेळी त्या युवकाने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, कुमेल कुरेशी त्या इसमाला म्हणाला करतोयस की नाही खतना ? लग्न करणाऱ्यांनी केलेल्या कृत्याने त्यांनी माझ्या धर्माचा अपमान केला आहे. अशा आशयाची फिर्याद दौंड पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे,अशी माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय अधिकारी राहुल धसे करत आहेत. गुन्हा दाखल होताच कुमेल कुरेशी व त्याचा साथीदार फरार झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये