क्राईमताज्या बातम्यादेश - विदेश

दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच असुरक्षित; ट्वीट करत सांगितला घडलेला प्रकार

नवी दिल्ली | दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत स्वत: स्वाती मालीवाल यांनी ट्वीट घडलेला प्रकार सांगितला आहे. या घटनेत आरोपीने त्यांना फरपटत नेल्याचंही त्या म्हणाल्या. गुरूवारी रात्री ३ वाजेच्या सुमारास एम्स रुग्णालयाजवळ ही घटना घडली आहे.

स्वाती मालीवाल म्हणाल्या की, “दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेची स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी मी गेल्यानंतर एका मद्यधुंद गाडी चालकाने माझ्याशी छेडछाड केली. मी त्याला पकडले त्यावेळी त्याने गाडीच्या खिडकीमध्ये हात अडकवला आणि मला ओढत नेलं. देवाने जीव वाचवला. जर दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील तर परिस्थितीची कल्पना करा.”

स्वाती मालीवाल गुरुवारी पहाटे 3.11 च्या सुमारास एम्स जवळील फुटपाथवर असताना हरीश चंद्रा हा माणूस बलेनो कारमध्ये चढला आणि त्याने मालीवाल यांच्याशी छेडछाड केली. तो खूप मद्यधुंद अवस्थेत होता. त्यावेळी महिला आयोगाची टीम त्या ठिकाणापासून काही अंतरावर होती. दिल्लीतील घडलेल्या या गंभीर घटनेप्रकरणी 47 वर्षीय हरीश चंद्रा या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये