फुरसुंगीत पाण्याच्या टँकरमध्ये सापडला महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ
पुणे शहरातील फुरसुंगी परिसरातील पावर हाऊस हरपळे वस्ती या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा टँकरमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याची खळबळजण घटना घडली असून माहिती मिळतात पोलीस प्रशासनाने टँकरमधील पाणी खाली करून तो मृतदेह बाहेर काढला. टँकरमध्ये सापडलेला मृतदेह महिलेचा असून हा मृतदेह कोणाचा आणि त्याची ओळख काय त्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत, यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.
महिलेचा मृतदेह पिण्याच्या पाण्याच्या टँकर मध्ये आढळल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, हा टँकर कोणाचा कुठून आला हा मृतदेह कोणाचा असे विविध प्रश्न निर्माण झाले असून परिसरामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. कौशल्या मुकेश चव्हाण असं या मृत महिलेचे नाव आहे. या महिलेची हत्या झाली की तिने आत्महत्या केली यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
हेही वाचा- पुण्यात सांडपाणी गटारांच्या चेंबरची दुरावस्था; नागरिक त्रस्त
हरपळे वस्ती परिसरातील महागणपती मंदिराच्या जवळ उभ्या असलेल्या टँकरमध्ये हा महिलेचा मृतदेह आढळला असून या ठिकाणी ये जा करणारा रस्ता अरुंद आणि खड्डेमय असल्यामुळे पोलीस प्रशासनाला तो टँकर त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवून चेक करावा लागला. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणातील सूत्रधारास जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.