मुंबई – Deepak Kesarkar : राज्यातील राजकारण हे सध्याच्या वातवरणाकडे बघता तर मनोरंजनाचा भाग झालेलं दिसत आहे. राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे नाकेनऊ आणले आहेत. वेगवेगळ्या समश्यांनी राज्याला घेरलं आहे. मात्र, लोकप्रतिनिधींचा एकमेकांवर आरोप करण्याचा, मारामाऱ्या करण्याचा कार्यक्रम काही थांबत नाहीये.
शिवसेनेचे नेते शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार म्हणवून डिवचत राहतात तर, शिंदे गटाचे नेते त्याविरोधात वंगाळ भाषा बोलायलाही कमी करत नाही. दरम्यान, उध्दव ठाकरे यांनी आम्हाला बदनाम करू नये असा इशारा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यानी दिला आहे.
“उद्धव ठाकरे यांनी ते मुख्यमंत्री असताना त्यांनी किती वेळा मंत्रालयाची पायरी चढली ते सीसीटीव्हीत बघा. ज्यांनी कधी मंत्रालयात पाउल ठेवले नाही त्यांनी आमची बदनामी करू नये. मनाला वेदना होतात. आम्ही त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं नाही असं ठरवलं होतं पण, कोणाला काहीही बोलायचं. महाराष्ट्रभर फिरून वाईट शब्दांत बदनामी करायची. असं असल्यावर काय करणार. आदित्य ठाकरे देखील महाराष्ट्राला भरकटवण्याचं काम करत आहेत.” अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे.