ताज्या बातम्यारणधुमाळी

“…म्हणून तुम्ही घरोघरी फिरायला लागले आहात”, दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

मुंबई | Deepak Kesarkar On Aditya Thackeray – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट (Shinde Group) असा सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तसंच  वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) राज्याबाहेर गेल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी काल (24 सप्टेंबर) तळेगावमध्ये जनआक्रोश यात्रा काढली. त्यावरून आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) आदित्य ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. 

सध्या आदित्य ठाकरे राज्यात्या वेगवेगळ्या भागात फिरत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील दसरा मेळावा (Dasara Melava) झाल्यानंतर नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर दीपक केसरकरांनी टीका केली आहे. “तुमची सत्ता गेली म्हणून आज तुम्ही हे करत आहात. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येही येत नव्हता. आज सत्ता गेल्यानंतर तुम्ही घरोघरी फिरायला लागले आहात”, असं केसरकर म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. “शिवसैनिकांना साधी तुमची भेट मिळत नव्हती. आमच्यासारखे ज्येष्ठ आमदार वर्षासमोर रस्त्यावर उभारत होते. ही परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रावर आणली होती. आता तुम्ही लोकांना खोटं सांगत फिरता. त्यामुळे आता आम्हालाही महाराष्ट्रभर लोकांना खरं सांगत फिराव लागेल. पण आम्ही आमची कामं सांभाळून ते लोकांना सांगू. कामं ठेवून आम्ही आमच्या यात्रा काढणार नाही. माझी यात्रा असताना मी शाळांना भेटी दिल्या आहेत. आमच्या विभागाच्या बैठका घेतल्या आहेत. एवढं काम आम्ही दिवसरात्र करतो”, असंही दीपक केसरकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये