‘बंडखोर दीपक केसरकर म्हणाले, मुंबई महापालिकेत भाजपची 2017 साली सत्ता असती; पण…

मुंबई : (Deepak Kesarkar On Uddhav Thackeray) दोन महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी केली. त्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप, टिका-टिपणी, वार-प्रतिवार पहायला मिळत आहेत. आज पुन्हा बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते तथा मंत्री दिपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.  

दरम्यान यावेळी केसरकर म्हणाले, 2017 आली मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता असती. पण देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा मान ठेवून तस काही केलं नाही. सध्या तोंडावर आलेल्या महापालिकेत भाजप आणि शिंदे गट युती करणार असून आम्ही दोघंही मिळून 150 पेक्षा अधिक जागा निवडून आणू. आमची युती आता कायम राहणार असून, स्वार्थासाठी आम्ही कधीही युती तोडणार नाही असंही ते म्हणाले.

बाळासाहेबांची इच्छा नसणाऱ्या लोकांसोबत सत्ता बनवलीत. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही मुलगा आणि वडील मंत्री झाले नाहीत. ते यांनी घडवलं, असंही केसरकर म्हणाले. यांना लोकशाहीची परंपरा तोडावी लागली. आदित्य ठाकरे हे चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. अमित शाहांच्या चर्चेचा हवाला देता तर मोदी यांच्यासोबत काय चर्चा झाली ते सांगा. भाजपशी चर्चा न करता राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवलं गेलं. जनतेला दिलेला शब्द यांनी मोडला, असंही केसरकर म्हणाले. 

Prakash Harale: