“दुसर्यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार”; दिपाली सय्यदांचा राज ठाकरेंना टोला!

मुंबई : (Raj Thackeray On dupty CM Devendra Fadnavis) भाजपाच्या साथीने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. गुरुवार दि. ३० रोजी सायंकाळी साडेसात वाजता राजभवन हाॅल येथे छोट्याखानी त्यांचा शपथविधी पार पडला. त्यांच्यासोबत भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
दरम्यान त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना म्हणाले, एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे, एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचं मन:पूर्वक अभिनंदन!, अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या.
त्याला उत्तर म्हणून, दिपाली सय्यद यांनी ट्विट करत मनसे अध्यक्षांना सवाल केला आहे की, “दुसऱ्यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार माननीय राजसाहेब कधीतरी १ आमदारा वरून तुमचा धनुष्यबाण २ आमदारावर पोहचवुन जनतेला दाखवुन द्या कि कर्तृत्व नक्की काय असते, नाहीतर सारखी दोरी मागे ओढावी लागते हे बरे नव्हे!” असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.