ताज्या बातम्यामनोरंजन

टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर दीपिकाचा जलवा

मुंबई | Deepika Padukone – अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. तसंच दीपिका ही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते. आताही तिच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. TIME मॅगझिनच्या कव्हर पेजवर दीपिका झळकली आहे. विशेष म्हणजे ती या मॅगझिनच्या मुख्यपृष्ठावर स्थान मिळवणारी सहावी भारतीय सेलिब्रिटी ठरली आहे.

दीपिकाच्या अगोदर टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर ऐश्वर्या राय बच्चन, परवीन बाबी, आमिर खान, प्रियांका चोप्रा आणि शाहरूख खान या बाॅलिवूड सेलिब्रिटींनी स्थान मिळवलं होतं. तसंच आता दीपिका या मॅगझिनवर झळकल्यानं तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

याबाबत दीपिकानं सांगितलं की, “माझ्या देशात राहात असताना माझं जगभरात प्रभाव पाडण्याचं ध्येय नेहमीच असणार आहे. भारतीय चित्रपटांनी सीमा ओलांडल्या असून आज भारतीय लोक सर्वत्र आहेत. त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला प्रसिद्धी मिळतेच.”

दीपिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाइमच्या कव्हर पेजसाठी केलेल्या फोटोशूटच्या BTS चे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तिच्या या फोटो आणि व्हिडीओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये