ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्ररणधुमाळीसिटी अपडेट्स

सातारचा ‘कंदी पेढा’ कसब्यात पडला फिक्का; बिचुकलेंना पुणेकरांनी दिला धक्का, पडली इतकी मतं..

पुणे | Kasba Bypoll Election Result 2023 – पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचा निकाल (Kasba Bypoll Election Result) जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला आहे. धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा तब्बल 10 हजार मतांनी पराभव केला आहे. गेल्या 28 वर्षांपासून भाजपच्या हातात असलेला हा मतदारसंघ आता मविआने ताब्यात घेतला आहे.

‘बिग बाॅस’ फेम अभिजीज बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. परंतु, या निवडणुकीत त्यांचा दारून पराभव झाला आहे. बिचुकलेंना केवळ 48 मतं मिळाली आहेत. पहिल्या फेरीत त्यांनी 4 मतं पडली. तर दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत त्यांना शून्य मतं मिळाली आहेत. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत बिचुकलेंना मतांची हाफ सेंच्युरीही पूर्ण करता आलेली नाही.

अभिजीत बिचुकलेंनी कसब्यात जोरदार प्रचार केला होता. त्यांना पोटनिवडणुकीसाठी कपाट हे चिन्ह मिळालं होतं. तसंच एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर बिचुकलेंनी त्यांची भेट घेतली होती. तर बिचुकलेंनी त्यांच्या पत्नीला राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

    Related Articles

    Leave a Reply

    Back to top button
    error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये