कुटुंबासमोर लैंगिक आयुष्याबद्दल बोलणे, पतीला नपुंसक म्हणणे ही क्रूरता : उच्च न्यायालय
दिल्ली | कुटुंबातील सदस्यांसमोर पत्नीने पतीचा उघडपणे अपमान करणे आणि त्याला नपुंसक (Impotent) म्हणणे हे मानसिक क्रूरता (Mental Cruelty) निर्माण करणारे अपमानास्पद कृत्य असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) नोंदवलं आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 13 (1) (IA) अंतर्गत पत्नीला क्रूरतेच्या कारणास्तव पतीला घटस्फोट मंजूर करताना हे निरीक्षण नोंदवलं.
खंडपीठाने सांगितले की, आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की इतरांसमोर पतीचा उघडपणे अपमान करणे, नपुंसक म्हटले जाणे आणि प्रतिवादीने (पत्नी) कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्याच्या लैंगिक जीवनावर चर्चा करणे, हे क्रूर मानसिक कृत्य आहे. अपीलकर्त्याचा (पतीचा) अपमान करण्याचे हे कृत्य मानसिक क्रौर्यासारखे आहे