ताज्या बातम्या

सध्या ट्रेंड मध्ये असलेले डिटॉक्स वॉटर काय आहे? ते कसे बनवायचे?

Detox Water : बऱ्याचदा कॅफे, ऑफिस, दुकाने किंवा जवळपास सगळ्याच ठिकाणी विविध फळे किंवा लिंबू-पुदिनाच्या पाण्याने भरलेले काचेचे ग्लास दिसतात. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर सर्रास या पाण्याचा ट्रेंड बनलेला दिसून येतो. परंतु अनेकांना प्रश्न पडतो या पाण्यात काय आहे आणि लोक ते का पितात. तर विविध फळे किंवा औषधी वनस्पतींनी मिसळलेल्या या पाण्याला ‘डिटॉक्स वॉटर’ असे म्हणतात. ज्याचा शरीराला मोठा फायदा होतो आणि पोटात चिकटलेली घाण अथवा विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत मिळते. याशिवाय त्वचा अधिक सुंदर होण्यासही मदत मिळते.

डिटॉक्स वॉटर म्हणजे काय ?

डिटॉक्स वॉटर म्हणजे पाण्यात ताजी फळे, भाज्या किंवा औषधी वनस्पती मिसळल्या जातात. काही ठिकाणी याला फ्रूट-इन्फ्युज्ड किंवा फ्रूट-फ्लेवर्ड वॉटर असेही म्हणतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे अगदी सहजरित्या घरी बनवता येते आणि दिवसभर प्यायलेही जाते. ताजी फळे, भाज्या किंवा औषधी वनस्पती पाण्यात भिजवून डिटॉक्स वॉटर तयार केले जाते. मिसळलेल्या गोष्टींची चव हळूहळू पाण्यात सोडते. यात रस किंवा स्मूदीपेक्षा कमी कॅलरीज असतात.

डिटॉक्स वॉटर कसे बनवायचे ?

सफरचंद + दालचिनी

अर्ध्या सफरचंदाचे पातळ तुकडे करून 2 लिटर पाण्यात ते तुकडे आणि 2-3 दालचिनीचे तुकडे घायवेत. 3-4 तास तसेच ठेऊन याचे सेवन करावे. हे डिटॉक्स पाणी चयापचय वाढवते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रित करते.

image 1 4

स्ट्रॉबेरी + किवी

2-3 स्ट्रॉबेरी आणि 1 किवीचे छोटे तुकडे करून 2 लिटर पाण्यात टाकून 3-4 तास ठेऊन मग या टेस्टी आणि हेल्दी डिटॉक्स वॉटरचा आनंद घ्या. हे पेय तुमची चयापचय वाढवेल आणि भूक नियंत्रित करते. रक्तातील साखरेचे नियमन करून ऊर्जा देखील देईल.

image 1 5

आले + लिंबू + तुळस

1 लिंबाचे तुकडे 2 लिटर पाण्यात टाकून त्यात आल्याचे काही पातळ काप आणि 10-12 तुळशीची पाने टाकून रात्रभर ठेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी प्यावे.  यामुळे अपचनापासून सुटका होण्यास मदत होईल आणि वजन कमी होण्यासही मदत होईल.

image 1 6

काकडी + लिंबू + पुदिना

एक काकडी आणि एक लिंबू पातळ काप 2 लिटर पाण्यात टाकून त्यात 10-15 पुदिन्याची पाने घ्यावीत. काही तास हे पानी ठेवल्यानंतर दिवसभर प्यावे. लिंबू एक नैसर्गिक शरीर स्वच्छ करणारे आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील सुधारते.

image 1 7

ऑरेंज

संत्र्याचे 2-3 काप पाण्यात टाकून काही तासानंतर प्यावे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे निरोगी त्वचेसाठी उत्तम आहे. हे व्हिटॅमिन चरबी शरीरात साठवण्याऐवजी उर्जेमध्ये रूपांतरित करते. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

image 1 8

कोकोनट + मिंट + लेमन

थोडी पुदिन्याची पानं, 1 चमचा मध आणि एका लिंबाचा रस घ्यावा. नारळाच्या पाण्यात मलईचे बारीक तुकडे घालावेत आणि त्वरित प्यावे. कोकोनट मिंट लेमन डिटाॅक्स वाॅटर पचनास मदत करुन रोगप्रतिकारशक्ती वाढवते.  

image 1 9

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये