ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नुकसानग्रस्तांसाठी दहा हजारांची मदत

अजित पवारांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई | Ajit Pawar – राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे नुकसान झाल्याने त्यांच्या पाठीशी राज्य सरकार राहणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने 10 हजारांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. त्यांनी सोमवारी विधानपरिषदेमध्ये निवेदन सादर करत होते. राज्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांना मदत करण्यात येणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, 23 जुलै रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामध्ये मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मंत्र्यांनी भेटी दिल्या. ज्या ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे मृत्यू झाले त्या ठिकाणी मृताच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तातडीने द्यावेत, असे आदेश दिले आहेत. ज्यांच्या घरात पाणी शिरले होते त्यांना 10 हजार रुपये मदत करण्याचा सरकारने निर्णय घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी स्वस्त धान्याच्या दुकानातून आजच धान्य पुरवठा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच पुराच्या ठिकाणी रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छता करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवठा केला जाईल. — अजित पवार, अर्थमंत्री

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये