ताज्या बातम्यापुणे

जुन्नर वन विभाग अंतर्गत बिबट आपत्ती ग्रस्त क्षेत्र जाहीर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

जिल्हा वार्षिक योजना सन २४-२५ मध्ये जुन्नर वन विभाग अंतर्गत बिबट प्रणव क्षेत्रातील गावातील उपाययोजना करण्यासाठी कामांना जिल्हा वार्षिक योजना सर्व साधारण व आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत निधी व बिबट आपत्ती ग्रस्त क्षेत्र जाहीर करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांना दिल्याचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

आमदार अतुल बेनके यांनी बुधवारी (दि.१९) मुंबईत अजित पवार यांची भेट घेऊन जुन्नर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील गावांमध्ये विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची व बिबट आपत्ती ग्रस्त क्षेत्र जाहीर करण्याची मागणी निवेदनाद्वारे मागणी केली.आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जुन्नर वनविभागात सन २००१ पासून बिबट वन्यप्राण्याचा मानवी वस्तीत सातत्याने प्रवेश होऊन व्यक्ती व पाळीव पशुधन यांच्यावरील हल्ल्यांच्या घटनात वाढ झाली आहे. सदर घटनांमुळे स्थानिक लोकांच्या रोषाला सामोरे जाव लागत आहे.जुन्नर वनविभागामध्ये मानव बिबट संघर्ष जास्त प्रमाणात वाढला आहे.

हेही वाचा- प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा; विश्व वारकरी सेनेची मागणी

सन २०२४ मध्ये या वनविभागात बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या तीन महिन्यात दोन गंभीर जखमी व चार मृत्युच्या घटना घडलेल्या आहे. प्रकरणी सदर ठिकाणी जनक्षोभ उसळला असुन मानवी जीवन धोक्यात आलेले आहे. स्थानिक लोकांचा उद्रेक झाला असुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रकरणी बिबट्याचा मानवा वरती हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असुन सदरचे क्षेत्र मानव – बिबट संघर्षाचे संवेदनशील आपत्ती क्षेत्र झालेले आहे. सदर बाब या वनविभागात नित्याची झालेली आहे.

हेही वाचा- जळगावमध्‍ये पाणीपुरीतून १०० जणांना विषबाधा

सन २४-२५ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून आपदा मित्र प्रशिक्षण देण्यासाठी निधी देणे, मानव बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी साहित्य खरेदी करणे, मानव बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या कुटुंबाकरिता टेंट खरेदी करणे,मानव बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या कुटुंबाकरिता सोलर लाईट खरेदी करणे, मानव बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अति संवेदनशील भागासाठी अनायडर खरेदी करणे, मानव बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बिबट प्रवण क्षेत्रातील गावातील शेतकऱ्यांना नेक बेल्ट खरेदी करणे,मानव बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बिबट प्रणव क्षेत्र असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजेंटवर आधारित कॅमेरे बसवणे, वनसंरक्षण कामांकरिता जुन्नर परिक्षेत्र करिता ७ वाहने खरेदी करणे, ट्रॅप कॅमेरा खरेदी करणे, सापळा पिंजरा ( Tarp cages) खरेदी करणे, भिंत पिंजरा (well cages) खरेदी करणे, रेर-क्यु सदस्याकरिता मानधन देणे, नायलॉन दोरी (Nylon let) खरेदी करणे, अतिसंवेदनशील क्षेत्रात बिबट जनजागृती करण्यासाठी इंधन खर्च देणे, बिबट प्रणव क्षेत्रातील पिंजरे वाहतूक करणे करिता निधी देणे, मानव बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये ग्रस्त घालण्यासाठी खाजगी वाहनांचे भाडे अदा करणे, ड्रोन (Thermal drone) खरेदी करणे आदी बाबींना निधी उपलब्ध करून देण्याचे व आपत्ती ग्रस्त क्षेत्र जाहीर करण्याचे जिल्हाधिकारी डॉसुहास दिवसे यांना पालकमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

हेही वाचा- सीबीएसई शाळेत मुलांना शिक्षण देता येत नसल्याने आईने उचलले टोकाचे पाऊल

याबाबत संबंधित डॉ. नामदेव गार्डे यांच्याशी भ्रमनध्वनी वरून संपर्क साधला असता, ते म्हणाले की, माझ्यासमोर अर्जंट तपासणीचे रुग्ण आहे. याबाबत मी उद्या तहसिलदार यांच्याबरोबर बैठक करणार असून, त्यावेळी माहिती देईन. असे सांगण्यात आले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये