ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी
Breaking News : उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पाच दिवसांची CBI कोठडी

नवी दिल्ली | Manish Sisodia – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सिसोदिया यांना मद्य घोटाळा प्रकरणी रात्री अटक करण्यात आली होती. तसंच आता राऊज अवेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
आज मनीष सिसोदिया यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सीबीआयनं मनीष सिसोदिया यांच्या कोठडीची मागणी केली होती. चौकशीदरम्यान दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, असा युक्तिवाद सीबीआयनं (CBI) केला.
दरम्यान, न्यायालयानं मनीष सिसोदिया यांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दिल्लीतील मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना सीबीआयनं रविवारी अटक केली होती.