ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळीविश्लेषण

फडणवीसांनी पुन्हा टायमिंग साधले!

पुणे : मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव मीच पक्षाच्या नेत्यांना सुचविले, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील समज, गैरसमज, तर्कवितर्क यांना पूर्णविराम दिला.

राजकारणात कृती आणि उक्ती करताना योग्य ते टायमिंग साधण्यात मुत्सद्दीपणा असतो. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायमिंगचे अचूक भान राखलेले आहे. अगदी अलीकडे त्याचे दर्शन महाराष्ट्राला घडले. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी काही काळावर येऊन ठेपला असताना फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव सुचविले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ही घोषणा करण्यासाठी त्यांनी अचूक टायमिंग साधल्याने समाजमनावर मोठा परिणाम झाला आणि फडणवीस यांची प्रतिमा उंचावली.

असेच टायमिंग साधत फडणवीस यांनी सचिन वाझे यांचा भ्रष्टाचार आणि मनसुख हिरानी यांचे खून प्रकरण विधिमंडळात मांडले. देशभर गहजब झाला. सरकारची बाजू मांडताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही तारांबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा वादग्रस्त जमीन व्यवहारही फडणवीस यांनी टायमिंग साधत चव्हाट्यावर आणला. परिणामी मलिक यांना तुरुंगाची हवा खावी लागली.

मनातली खदखद केली व्यक्त…

“हिंदू धर्माच्या विरोधात काम करणारे सरकार जाऊन आता हिंदूंचे आणि सामान्य माणसाचे सरकार आता सत्तेत आले आहे. फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या अथक परिश्रमातून हे सरकार स्थापन झाले आहे.

महाराष्ट्रातील विकासविरोधी आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणारे कृत्रिम आघाडी करून सत्तेत आलेलं सरकार आता कोसळले आहे. आता महाराष्ट्रात विकासासाठी कटिबद्ध असलेलं सरकार आलं आहे. असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्यात विकासाला विरोध करणारे, गुन्हेगारांना पाठिंबा देणारे सरकार आले होते. हे विचित्र सरकार होते. विकासाची अनेक कामे ठप्प झाली होती. हे सरकार कृत्रिम आघाडी करून सत्तेत आले होते. हे सरकार हिंदूविरोधी सरकार होते. या सरकारमध्ये चांगल्या लोकांना विनाकारण त्रास झाला. चांगल्या लोकांना विनाकारण तुरुंगात घातलं गेलं, असे पाटील म्हणाले.

सध्या भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून समज, गैरसमज पसरले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी द्वेषापोटी फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदावरचा हक्क काढून घेतला आणि त्यांना उपमुख्यमंत्रिपद घेण्यास भाग पाडले, अशी समजूत सर्वत्र पसरली.

सोशल मीडियावर अमित शहा ट्रोल झाले. भाजपचे एक पदाधिकारी सचिन जोशी यांनी तर देवेंद्रजींच्या अभिनंदनासाठी लावलेल्या फलकावरून अमित शहा यांचे चित्र गायब केले. पुण्यातही भाजपच्या एका पदाधिकार्‍याने प्रभागात पत्रके वाटली, त्यावरुनही अमित शहा यांचे चित्र काढून टाकण्यात आले होते. एक, दोन फलकांपुरता मर्यादित असलेला हा प्रकार वाढत गेला तर, पक्षाची प्रतिमा मलीन होईल आणि केंद्रीय नेतृत्वा बरोबर मतभेद आहेत असे चित्र देशभर पसल. हा धोका फडणवीस यांनी वेळीच ओळखला आणि हे प्रकार रोखायचे असतील तर, आपण स्वतःच पुढाकार घेणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री निवडीच्या राजकारणाचा खुलासा केला.

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी असा प्रस्ताव मी स्वतःच केंद्रीय नेत्यांना दिला होता. तो प्रस्ताव सर्व नेत्यांनी मान्य केला, असे स्पष्ट केले. फडणवीस यांनी अगदी वेळीच हे सर्व स्पष्ट केल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी निर्माण झालेले गैरसमज दूर झाले. अमित शहा यांच्याविषयी अकारण गैरसमज करुन घेऊ नका, असा सा भाजपच्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी त्या पत्रकार परिषदेतून दिला. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात मतभेद आहेत, असे पसरवू पाहाणार्‍या हितसंबंधीयांनाही फडणवीस यांनी परस्पर लगाम घातला. मनाचा मोठेपणा आणि नेतृत्वगुण सिद्ध करताना फडणवीस यांनी भाजपचे हित राखले. महाराष्ट्रातील पक्षसंघटनेत साचू लागलेले मळभही दूर केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये