देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर चर्चेला उधाण!

मुंबई : (Devendra Fadnavis Meet On Raj Thackeray) राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीसांचं कौतुक करणारं पत्र त्यांना पाठवलं होतं. या पत्रामध्ये पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात टेवण्यासाठी आहे. अशा शब्दांत फडणवीसांचं अभिनंदन केलं होतं.
दरम्यान, राज ठाकरेंच्या या पत्रानंतर पुन्हा एकदा मनसे-भाजपा एकत्र येण्याची चर्चाला उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शक्यता वर्तवल्या जात असताना भाजपाने राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना मंत्रीपद देण्याची ऑफर दिल्याची चर्चा सुरू झाली होती. ही शक्यता राज ठाकरेंनी फेटाळून लावली असताना शुक्रवार दि. १५ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली,यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काही दिवसांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हिपबोन शस्त्रक्रिया झाली होती. सध्या राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबई महानगर पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे या भेटीमध्ये बदलत्या राजकीय समीकरणांवर देखील चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
त.