पवारांनी केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीसांकडून प्रत्युत्तर, म्हणाले “मी तर अख्या…,”

मुंबई : (Devendra Fadnavis On Ajit Pawar) माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार होते, “माझ्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकीनऊ आलं होतं, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार आहेत?”, असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले, “येत्या काळात कधी जर त्यांचं राज्य आलच आणि त्यांनाही जर दोन-चार जिल्हे पाहायचे असतील, तर ते कसे सांभाळायचे. याचा मी त्यांना निश्चित गुरुमंत्र देईन. मात्र हे सगळे जिल्हे नियोजनमंत्री म्हणून माझ्याकडे आहेत. मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळला आहे. त्यामुळे सहा जिल्ह्याचं काय घेऊन बसलात.” अशी मिश्किल टिप्पणी फडणवीसांनी पवारांवर केली आहे.
दरम्यान, “शिंदे-फडणवीस सरकारने शनिवारी पालकमंत्र्यांची घोषणा केली. काही जिल्ह्यांना एकच पालकमंत्री दिला आहे, तर काही पालकमंत्र्यांकडे दोन-दोन, तीन-तीन जिल्हे दिले आहेत. त्यावरुन अजित पवारांनी ही टिका केली होती, त्याला फडणवीसांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.