नागपूर : (Devendra Fadnavis On Apposition MLA) राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मागील महाविकास आघाडी सरकारच्या मंजूर करण्यात आलेल्या विकास कामाच्या मंजूरींना कात्री लावण्याचे काम केले. यामुळे विरोधी पक्षातील आमदारांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवल्यानंतर आज यावर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान यावर बोलताना फडणवीस म्हणाले, राज्याचा अर्थमंत्रीच नागपूरचा पालकमंत्री आहे. त्यामुळे नागपूरच्या विकासाला कोणतानी निधी कमी पडणार नाही, ‘मैं हू ना’ असे म्हणात एकप्रकारे नागपूरकारांना विश्वास देण्याचे काम त्यांनी केलं आहे. यावर राजकीय चर्चा उमटताना दिसत आहे, फडणवीस यांचे हे विधान भाजप आमदारांसाठी आहे की, त्याची व्याप्ती सर्वसमावेशक आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
हा सवाल उपस्थित होण्याचे मुळ कारण म्हणजे, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंजूर विकासकामांना शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. या प्रस्तावांना फेरमंजूरी देण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातील कामांना फडणवीस पालकमंत्री म्हणून फेरमंजुरी देणार का? अशा शंका येताना दिसत आहेत.