“आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत अन् …”, उपमुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला!

मुंबई : (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray) दोन महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह बंडखोरी अन् राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. कोणाचाही विश्वास बसणार नाही की, एवढ मोठं भगदाड शिंदेंच्या संडखोरीनं शिवसेनेला पडलं. काॅंग्रेस, राष्ट्रवादीत खांदापालट करणारे भरपूर भेटतील. पण मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेत निष्ठवंतही बंडखोरी करतात उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे.
दरम्यान, तेव्हापासून एका बाजूला शिवसेना तर दुसऱ्या बाजूला बंडखोर शिंदे गट आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु झालं आहे. शक्य तेव्हा आणि उत्साहातही भाजप, शिंदे गट शिवसेनेवर कुरघोडी करताना दिसत आहे. दरम्यान काल पार पडलेल्या दहीहंडी उत्साहाच्या प्रत्येक कार्यक्रमात शिंदे-फडणवीस ठाकरेंवर तुटून पडल्याचे दिसून आले. मात्र, आदित्य ठाकरेंनी प्रतीउत्तर देण्यास टाळत ते म्हणाले, आजचा दिवस आनंदाचा, उत्सह साजरा करण्याचा आहे. राजकरण करायला आपल्याला 364 दिवस बाकी आहेत. त्यामुळे आज कोणाच्याही प्रतिक्रियेवर बोलणे उजित होणार नाही असे आदित्य म्हणाले.
आज मुंबईत भाजपचा मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण सर्वांनी कालची मुंबई पाहिली का? तोच उत्साह, तोच जल्लोष, तीच संस्कृती दिसून आली. पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं, हे आपण सगळ्यांनी बघितलं. काल दहिहंडी जोरात होती. आता गणपती, नवरात्र असे सर्व उत्सव जोरात करायचे आहेत. आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत, असं फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली.