ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळीसिटी अपडेट्स

“काही लोकांनी बेईमानी केल्यामुळे अडीच वर्ष…”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई | Devendra Fadnavis – आज (19 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर आहेत. तसंच आता बीकेसी मैदानावर (BKC Ground) त्यांची सभा पार पडत आहे. या सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला आहे. “काही लोकांनी बेईमानी केल्यामुळे अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं नाही,” असं देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) म्हटलं आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळीकडेच लोकप्रिय आहेत. पण, लोकप्रियतेची स्पर्धा झाली, तर मोदींच्या लोकप्रियतेत मुंबई पहिल्या क्रमांकावर असेल. इतकं मोदींवर मुंबईकरांचं प्रेम आहे. मोदींनी 2019 मध्ये मुंबईतच म्हटलं होतं की, पाच वर्षांच्या डबल इंजिन सरकारनं महाराष्ट्राला बदललं आहे. तसंच डबल इंजिन सरकार पुन्हा एकदा आणण्याचं आवाहन केलं.”

“महाराष्ट्राच्या जनतेनं मोदींवर विश्वास ठेऊन डबल इंजिन सरकार निवडून दिलं आहे. पण, काही लोकांनी बेईमानी केली आहे. त्यामुळे अडीच वर्ष जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हिंमत केली आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये