इतरताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

‘…वेश्यांना द्यायच्या पैशांवर डल्ला मारणारे डल्लेबाज…’- देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या सरकारने वेश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच वेश्याच्या पैशात डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही. तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तोच शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल, असं म्हणत खोचक शब्दांत फडणवीसांनी टोला लगावला. ते गडचिरोलीत माविआ सरकारच्या विरोधात भाजपाने आयोजित केलेल्या महाजन आक्रोेश मोर्चात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, या सरकारची नियत काय आहे बघा, केंद्र सरकारने सांगितलं कोरोना काळात दुर्दैवाने ज्या भगिनींना वेश्या व्यवसाय करावा लागतोे त्यांना मदत करा, त्यांना मदत करण्याची घोषणा केली. आम्हाला वाटलं चला एका घटकाला तरी हे मदत करत आहेत, पण हे नालायक निघाले. नांदेडमधील केस आहे, मी परवा हे सभागृहात मांडलं.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, एका कुठल्यातरी संस्थेला पैसे दिले आणि त्यांनी वेश्यांना द्यायला हवे ते पैसे आपल्या नातेवाईकांमधील लोकांना वाटून टाकले. वेश्याच्या पैशात डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही. तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तुम्हाला देखील माहिती आहे. तोच शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल. कारण या सरकारमध्ये वेश्यांना द्यायच्या पैशांवर डल्ला मारणारे डल्लेबाज पहायला मिळतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये