देवेंद्र फडणवीस वेशांतर करून शिंदेंना भेटायला जात होते- अमृता फडणवीस

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी बंड केलं आणि ते आमदारांना घेऊन सुरतमध्ये आणि गुवाहाटीमध्ये गेले होते. त्यावेळी कोणत्याही आमदाराशी संपर्क होत नव्हता. मात्र त्यावेळी सर्व आमदार झोपले की मी रात्री फडणवीसांना भेटायला जात असल्याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या भाषणात केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना दुजोरा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस हे रात्री वेश बदलून शिंदे यांना भेटायला जात होते. हुडी आणि गॉगल घालून ते भेटायला जात होते. त्यांचा हा वेशांतर पाहून मीही त्यांना ओळखत नव्हते असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नाही हे मला आधीच माहित होतं, ते कोणतंही पद स्वीकारणार नव्हते. त्यांच्या या निर्णयाचा मला खूप गर्व वाटतो. त्यांनी मोठ्या मनाने आणि हसतमुखाने शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या.