2024 मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा; म्हणाले, “देवेंद्र फडणवीस…”
भंडारा | Chandrashekhar Bawankule : 2024 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असं वक्तव्य चंद्रशेख बावनकुळेंनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पुढच्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होणार आहेl. या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी गावात भाजपकडून दिवाळी मिलन कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं आहे. बावनकुळेंनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
कार्यक्रमादरम्यान चंद्रशेखर बावनकुळेंना एका कार्यकर्त्यानं प्रश्न विचारला की, 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असं बावनकुळे म्हणाले.
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना तीन संकल्प दिले. यामध्ये पहिला संकल्प म्हणजे मे महिन्यात देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी शपथ घेतील. त्यासाठी आपल्याला महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून पाठवायचे आहेत. तसंच भंडाऱ्यातील खासदार हा सर्वाधित मतांनी निवडून पाठवायचा आहे. तर दुसरा संकल्प मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेतील. यासाठी आपण सर्वांनी ताकद लावायची आहे. तर तिसरा संकल्प आपल्याला आपले उमेदवार चांगल्या मतांनी निवडून आणायचे आहेत, असंही बावनकुळे म्हणाले.