अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाचा मोर्चा
अलिबाग | रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल धनगर समाज रायगड यांच्या वतीने धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकला आणि त्यांच्या तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
हा मोर्चा जिल्हापरिषद कार्यालय येथून ढोल ताश्याच्या गजरात, गजी नृत्य करत, घोषणा देत लाखोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखो समाज बांधवासह काढण्यात आला.
यावेळी “सरकारने यशवंत सेनेला दिलेल्या पत्रानुसार जर 50 दिवसांत धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करून समाजाला एसटीचे सर्टीफिकेट दिले नाही, तर 51 व्या दिवसांनंतर हाच धनगर समाज संपूर्ण महाराष्ट्रातील रस्त्यावर उतरुन आंदोलन करील” असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी रायगड जिल्ह्यातून सकल धनगर समाजाच्या माध्यमातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.