ताज्या बातम्या

जाणून घ्या उत्तरकाशी बोगदा मदत आणि बचाव कार्य नेमकं कशा पद्धतीने सुरू आहे?

Uttarkashi Silkyara Tunnel Collapse Rescue Updates : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी यथील सिल्कियारा बोगदा कोसळून त्यात अडकलेल्या 41 कामगारांच्या सुटकेचा मार्ग अंतिम टप्प्यात आला आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या नेतृत्वाखालील बचाव कार्य आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे.

हे बचाव कार्य कशा पद्धतीचे आहे

ड्रिलिंग पूर्ण झाल्यावर, 15 सदस्यीय NDRF टीम हेल्मेट, ऑक्सिजन सिलिंडर आणि गॅस कटरसह 800 मिमी पाइपलाइनमधून आत जाईल. आत अडकलेल्या लोकांना बाहेरील परिस्थिती आणि हवामानाची माहिती दिली जाईल. बोगद्याच्या आतील आणि बाहेरील तापमानात मोठी तफावत असल्याने कामगारांना तातडीने बाहेर काढले जाणार नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कामगार अशक्त वाटत असल्यास NDRF टीम त्यांना स्केट्स बसवलेल्या तात्पुरत्या ट्रॉलीद्वारे पाइपलाइनमधून बाहेर काढेल. यानंतर 41 मजुरांना रुग्णवाहिकेतून चिल्यानसौर सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले जाईल. येथे 41 खाटांचे रुग्णालय तयार आहे. चिल्यानसौरला पोहोचण्यासाठी सुमारे 1 तास लागेल, ज्यासाठी ग्रीन कॉरिडॉर बनविला गेला आहे. गरज भासल्यास कामगारांना विमानाने ऋषिकेश एम्समध्ये नेले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये