पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स
‘वसंत उत्सव’ पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन

पुणे : सेवानिवृत्त उपनोंदणी महानिरीक्षक वसंतराव मसके यांच्या ७१व्या जन्मदिन सोहळ्यावर आधारित वसंत उत्सव या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी भारती विद्यापीठाचे कुलपती प्रा. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते झाले.
यावेळी सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्रा. एम. एन. नवले, तसेच अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक उपस्थित होते. सुनील महाजन, सतीश इटकर, संपादक सुश ठाकोर यांनी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. यावेळी वसंतराव मसके यांना शुभेच्छा देताना प्रा. शिवाजीराव कदम, एम. एन. नवले, सचिन इटकर, वेदपाठक आदी मान्यवर.