इतरक्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

पत्नीची ‘सुवर्ण’ पदकाला गवसणी अन् डीके भारावला

Dinesh Karthik Wife Win Gold Medal | सध्या चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स (Asian Games 2023) स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहायला मिळत आहे. तर अभिमानास्पद म्हणजे भारताच्या खात्यात सुवर्णपदकांची भर होताना दिसत आहे. तर यामध्ये भारताच्या दीपिका पल्लीकल (Dipika Pallikal) आणि हरिंदर पाल सिंह (Harinder Pal Singh) या जोडीनं स्क्वॉश (Squash) खेळात दमदार कामगिरी करत सुवर्ण पदकाला (Gold Medal) गवसणी घातली. विशेष सांगायचं झालं तर सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलेली दीपिका पल्लीकल ही भारतीय संघाचा स्टार खेळाडू दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik) पत्नी आहे.

पत्नी दीपिका पल्लीकलची सुवर्ण कामगिरी पाहून दिनेश कार्तिक भारावून गेला आहे. पत्नीच्या या दमदार कामगिरीवर दिनेशनं एक खास ट्विट केलं आहे. त्यानं ट्विटरवर दीपिका पल्लीकलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यानं लिहिलं आहे की, “पुन्हा सोनेरी वेळ आली. खूप छान दीपिका आणि हरिंदर.”

दरम्यान, 2010 मध्ये दीपिका पल्लिकलनं पहिलं पदक जिंकलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये तिनं 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं होतं. तर 2018 मध्येही तिनं कांस्य पदक जिंकलं होतं. तर आता तिनं सध्या सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत 1 कांस्यपदक पटकावलं. नंतर फायनलही जिंकून दीपिकानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये