मुंबई | Prakash Ambedkar And CM Eknath Shinde – काल (11 जानेवारी) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात बंद दाराआड अडीच तास चर्चा झाली आहे. तसंच या बैठकीत राजकीय चर्चा झाली असून प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटासोबत युती करू नये असा आग्रह मुख्यमंत्री शिंदेंनी केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची काल मुंबईत अडीच तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यान ठाकरे गटासोबतच्या आघाडीवर आंबेडकरांचं मन वळविण्याचा प्रयत्न शिंदेंनी केला आहे. याआधीही 16 नोव्हेंबरला एकनाथ शिंदेंनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. तसंच प्रकाश आंबेडकर शिंदे गटासोबत आले तर राज्यातील इतरही दलित नेते सोबत येणार असल्याची शक्यता आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर ठाकरे गटासोबतच्या युतीवर ठाम असल्याचीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) असल्याचं जाहीर केलं होतं. तरीही काल आंबेडकर आणि शिंदे यांच्यात बैठक पार पडली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. त्यामुळे आता या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची नेमकी भूमिका काय? असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
View Comments (0)