ताज्या बातम्यापुणे

विविध तालुक्यातील ७७६ कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्र मोल्ड वाटप

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाऊंडेशन मुंबई व ओएनजीसी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ७७६ कर्णबधीर शालेय लहान मुलांना मोफत श्रवण यंत्र मोल्ड वाटप सदाशिव पेठेतील फडके हॉल पुणे येथे करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातून ही मुले पुण्यात या शिबीराकरीता आली होती.
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आजपर्यंत अनेक रुग्णांना यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. केवळ पुण्यातच नाही, तर इतरही शहरात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावरुनच समाजातील मोठी व्यथा समोर येत असल्याचे दिसून आले आहे. या शिबीरात खेड, जुन्नर, मंचर, शिरुर, इंदापूर, आंबेगाव, पेरणे फाटा, उरळीकांचन, बारामती, भोर, वेल्हा, पानशेत आदी भागातील मुलांचा सहभाग होता.

लहान मुलांना ऐकायला येत नाही, हे पालकांना लवकर कळत नाही. त्यामुळे याविषयी जनजागृती करण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जी मुले आर्थिकदृष्टया दुर्बळ आहेत, त्यांना विनामूल्य श्रवणयंत्र दिले जात आहे. मुलांना ऐकायला येत नसेल तर ती केवळ ऐकू शकत नाहीत, असे नाही तर यामुळे अनेक मुले बोलायला देखील शिकत नाहीत. त्यामुळे याकडे लक्ष देऊन श्रवणयंत्र विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये