दीपावली : प्रकाशाचा अखंड स्रोत

राजश्री क्षीरसागर -सुपेकर

Diwali 2023 : उठा उठा दिवाळी आली..हे शब्द कानावर पडताच एक वेगळाच उत्साह येतो सगळी मरगळ निघून जाते. हा अनुभव बऱ्यापैकी प्रत्येकाचा असेल.हीं जाहिरातं प्रत्येकालाच आपल्या लहानपणीची आठवण करून देते.आणि खूप काही सांगून जाते.. मला ह्यामागील जाणवलेला गहन अर्थ म्हणजेच काय तर आपल्या भूतकाळातील दुःख, राग, भिती,न आवडणाऱ्या अश्या सगळ्या गोष्टी ज्याने आपल्या आयुष्यात अंधार झाला आहे. तो अंधार दूर करून उठा आणि प्रकाशात या. म्हणूनच काय तर आपल्या पूर्वजांनी ह्या सणाला दीपावली असं म्हटलं असावं दीपावली ह्या शब्दाचा अर्थच असा आहे प्रकाशाचा अखंड स्रोत  आणि हाच प्रकाश आपल्याला त्या ज्योती सारखा तेवत ठेवायचा आहे. आपल्यातील सगळे चांगले गुण म्हणजेच प्रेम, दया, सहिष्णुता,माणुसकी, सकारात्मकता ह्याचं मिश्रण एकत्र करून स्वतःला ह्या समाजात अखंड जागृत ठेवायचं आहे. अगदी त्याचप्रमाणे जसं पणती मध्ये दिवा लावतो. वातीचा आणि तेलाचा उपयोग करून मग ती ज्योत अखंड तेवत ठेवतो. असे हजारो दिव्यांची माला आपण घराबाहेर आणि आत लावतो.

हा सण दिव्यांचा, संस्कृतीचा,धनधान्यांचा  आताच्या भाषेत सांगायचं झालं तर abundance in love & wealth च प्रतीक असणारा.  अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. ह्या सणातून निसर्ग आपल्याला काय सांगू इच्छितो? आपल्या हिंदू धर्मातले प्रत्येक सण हे निसर्ग चक्र आणि मानवीजीवन ह्या दोघांमध्ये सांगड घालणारे आहे. दिवाळीचा प्रत्येक दिवस आपल्याला त्या निसर्गाचे विराट स्वरूप दर्शवतो. तो किती समृद्ध आहे किती भरभरून मानवाला निःस्वार्थपणे देत असतो.आणि त्यासाठीच निसर्गाप्रति आनंद, कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणजे दिवाळी. दिवाळीत सर्वात महत्व हे त्या पणतीला असतं.

अज्ञानाचा अंधःकार दूर करण्यासाठी अनेक पणत्या तेवत ठेवाव्या लागतील. ज्ञानाची ज्योत तेवत ठेवून  ज्ञान प्राप्त करून आपण आपल्यातील सुप्त गुणांना जागृत करू शकतो. जेंव्हा हे प्रकाशित आणि जागृत होतील तेंव्हाच खऱ्या अर्थाने ‘आनंदाची दिवाळी’ साजरी होईल.तेव्हाच खऱ्या अर्थाने फटाके फुटतील आपल्या  आतील अवगुणांचे, नेगेटिव्ह भावनाचे कारण त्याचं ओझंकित्येक वर्ष आपल्या मनात दाबून ठेवलेले असतें..ते आपल्या प्रियजनांसोबत बसून फटाके फोडल्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी विसरून त्यां भावनांचा उद्रेक घडवून संपवयाच्या असतात. आणि त्यातून प्रेमाचा प्रकाश आपल्या नात्यात आणायचा असतो. अश्यानेच आपण एकमेकांचा आनंद दिवगुणित करून सगळ्यांच्या आयुष्यात गोडवा आणू शकतो. तो गोडवा दिवाळीच्या मिठाई पेक्षा गोड असेल. अशी हीं दीपावली सगळ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा, आपुलकीचा, प्रेमाचा प्रकाश आणि गोडवा घेऊन सज्ज आहे चला तर लाखों आनंदाच्या आणि प्रेमाच्या पणत्या घेऊन ह्या दीपावलीच स्वागत करूया.

Rashtra Sanchar Digital: