‘निरामय’तर्फे वंचित मुलांची दिवाळी
पुणे : एखाद्या व्यक्तीला किंवा समाजाला काही तरी चांगले व शाश्वत निर्माण करायचे असेल तर शारीरिक व मानसिक दोषांचे प्रथम निवारण होणे आवश्यक असते. यातूनच एक सशक्त व समृद्ध समाज निर्माण होतो. या कामी निरामय वेलनेस सेंटर अखंडपणे कार्यरत आहे. परंतु समाजातील एक घटक भावनिकदृष्ट्या सुद्धा दोषविरहित होणे गरजेचे आहे. ज्याचे कोणीच नाही त्याला मदतीचा हात व प्रेमाचा शब्द हवा असतो. निरामय वेलनेसची यंदाची दिवाळी ही समाजाकडून दुर्लक्षित व कौटुंबिक प्रेमापासून वंचित अशा मुलांसोबत साजरी करण्यामागे हाच हेतू होता.
आपण समाजाचे देणे लागतो हा विचार भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून आहे. धर्म, अर्थ, काम व मोक्ष पैकी पहिल्या व चौथ्या पुरुषार्थांत याला अनुसरून कृती अभिप्रेत आहे. दुसऱ्या व तिसऱ्या पुरुषार्थांत देखील कृती करताना समाजभान ठेवणे अपेक्षित आहे. आजच्या भाषेत कॉर्पोरेट सोशल रिस्पाँसिबिलीटी (सीएसआर) किंवा सामाजिक बांधिलकी याच्या थोडे कार्यक्रमात भारतीय पंचांगावर आधारित दिनदर्शिकेचे प्रकाशन जवळ जाते. निरामयने स्वयंस्फूर्तीने या बाबतीत उचललेला हा खारीचा वाटा असणार आहे. सम्यक अशा भारतीय संस्कृतीच्या आकलनासाठी प्रसिद्ध असलेल्या सदाशिव पेठेतील भावे मुलींच्या प्राथमिक शाळेमध्ये हा सोहळा संपन्न झाला.