ताज्या बातम्या

दिवाळीत मुलांना द्या काही खास भेटवस्तू

Diwali Gifts For Kids : दिवाळीचा सण म्हणजे मोठा आनंदाचा, उत्साहाचा, चैतन्याचा उत्सव. दिवाळीला घराची स्वच्छता, गृहसजावट, रंगकाम अशा गोष्टी आवर्जुन केल्या जातात. त्याचबरोबर नवीन गोष्टी खरेदी केल्या जातात. या काळात नवीन कपडे, वाहन, सोने-चांदी खरेदीला प्राधान्य दिले जाते. एवढेच नव्हे, तर दिवाळीत प्रिय व्यक्तींना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मित्रमंडळींना आणि विशेषता लहान मुलांना भेटवस्तू दिल्या जातात. मात्र अशावेळी प्रश्न पडतो तो लहान मुलांच्या भेटवस्तूंचा. मोठ्या मंडळींना गिफ्ट देण्यासाठी अनेक पर्याय असतात. पण लहान मुलांना काय गिफ्ट द्यावं हे अनेकदा कळतच नाही. त्यामुळेच लहान मुलांना गिफ्ट देताना थोडा वेगळा विचार करावा लागतो आणि खालील प्रमाणे काही उपयुक्त पर्यायांचा विचार करावा.

कलर बॉक्स

असे कोणतेच मुल नसेल ज्याला पेंट करायला आवडत नसेल. त्यामुळे गिफ्टसाठी कलर बॉक्स हा पर्याय केव्हाही चांगला ठरेल. याशिवाय तुम्ही कलर बॉक्ससह ड्रॉइंग बुक देखील देता येऊ शकते.

कराओके मशिन

शक्यतो लहान मुलांना गाण्याची आवड असेल तर संगीताची आवड लक्षात घेऊन त्यांना कराओके मशीनही भेट देता येऊ शकते. यामुळे त्यांचे मनोरंजनही होईल आणि त्यांना संगीताची आवड निर्माण होईल.

मून लॅम्प

मुलांना स्टडी लॅम्प ऐवजी मून लॅम्प सारखं अनोख गिफ्ट देऊ शकता. लहान मुले त्याला स्टडी लॅम्प म्हणूनही वापर करू शकतात. मुलांना आवडू शकणारी ही वस्तु रूमच्या सजावटीसाठी देखील आकर्षक ठरेल.

मॅजिक प्लॅन्ट

मुलांना झाडांची, फुलांची आवड लावण्यासाठी हे एक छान गिफ्ट आहे. एका छोट्या कुंडीवर मुलांचे नाव लिहून एक छान रोप लावा. हे एक मॅजिक प्लॅन्ट आहे यांची काळजी घे, असे सांगून कुंडी मुलांना भेट घ्या.

ग्लोब

लहान मुलांना ग्लोबमध्ये खूप इंट्रेस्ट असतो. यामुळे मुलांचे ज्ञान तर वाढेलच पण ते त्यांच्या खोलीत एज्युकेशनल डेकोरेटिव्ह म्हणून सुद्धा वापर होऊ शकतो. यामुळे मुलांना सर्व ठिकाणांची ओळख होऊ शकते.

ज्वेलरी कीट्स

लहान मुलींमध्ये सर्वात जास्त क्रेज असलेली गोष्ट म्हणजे ज्वेलरी किट. मूलभूत दागिन्यांच्या किटमध्ये मणी, तार आणि चकाकी असते. हे रंगबेरंगी दागिने बनवून झाल्यावर मुली परिधान सुद्धा करू शकतात.

कथेची पुस्तके

लहान मुलांच्या ज्ञानात भर पडावी आणि त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरिता कथांची पुस्तके भेट द्यावीत. त्यामुळे त्यांना वाचण्याची सवयही लागेल. दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांना कथांची पुस्तकेही भेट देता येतील.

लंच बॉक्स

लहान मुलांसाठी ही भेटवस्तू परफेक्ट आहे. विशेषतः लंच बॉक्सवर मजेदार कार्टून प्रिंट असल्यास मुलांना ते आवडू शकते. त्यामुळे मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळे सेट्स आणि आकर्षक वॉटरबॉटल घेऊ शकता. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये