गौतमीच्या आडनावावरून पुण्यात बैठक; ‘पाटील’ नाही तर ‘हे’ आहे गौतमीचे खरे आडनाव

पुणे | गौतमी पाटील (Gautami Patil) हे नुसतं नाव ऐकलं तरी, अनेकाच्या तोंडी एकच वाक्य येतं ते म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील. हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात गाजला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवणाऱ्या गौतमी पाटीलचा सिलसिला दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात गौतमीचे कार्यक्रम पाहायला मिळत आहेत. गौतमीविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच गौतमीच्या आडनावाविषयी नवी माहिती समोर आली आहे. गौतमीच्या आडनावावरून पुण्यात चक्क बैठक पार पडली आहे.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण गौतमी पाटीलचे आडनाव पाटील नसून काही वेगळेच आहे. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे गौतमीच्या आडनावावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
एकेकाळी ऑर्केस्ट्रामध्ये अदाकारा म्हणून काम करणारी गौतमी आज सर्वांना मागे टाकून पुढे गेली आहे. एखाद्या अभिनेत्रीलाही नसेल अशी गौतमी पाटीलची क्रेझ महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे. कारण गौतमी पाटील आणि कार्यक्रम यशस्वी होणारच हे समीकरण झालं आहे.