आरोग्यताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शरद पवारांच्या प्रकृतीची माहिती समोर, खुद्द डाॅक्टरचं म्हणाले; “पुर्णपणे बरं होण्यासाठी पुढील…”

मुंबई : (Doctors gave information about Sharad Pawar’s health) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळं मागील दोन दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. काल सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. मात्र, डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना पुर्णपणे बरं होण्यासाठी पुढील एक-दोन दिवस लागणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, उद्यापासून शुक्रवार दि. 4 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून शिर्डी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. मंथन वेध भविष्याचा असं राष्ट्रवादीने शिबिराला नाव दिलं आहे. त्यापुर्वी म्हणजे आज सायंकाळपर्यंत पवारांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यासाठी खुद्द शरद पवारांनी देखील सहमती दर्शवली होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवार साहेबांनी प्रकृत्ती पुर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत आराम करावा, असं मत व्यक्त केलं होतं.

या शिबिराला स्वःता शरद पवार मार्गदर्शन करणार होते. त्यामुळे माध्यमांमध्ये शरद पवार यांना आज सकाळी डिस्चार्ज मिळणार अशा प्रकारच्या बातम्या येत असताना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी खुद्द समोर येत माध्यमांना माहिती दिली आहे. त्यांना पूर्णपणे बर होण्यासाठी 2 दिवस तरी लागणार आहेत. त्यामुळे सर्व चर्चेला आता पुर्णविराण मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये